जळगाव विमानतळाजवळ भीषण अपघात; एक जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी । समोरासमोर दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीवरील तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुसुंबा विमानतळ येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रितेश सुरेश रायपुरे (वय-४४) रा. सुप्रीम कॉलनी हा आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ एवाय ८६२६) हा दुचाकीने कामानिमित्त विमानतळसमोरून जात असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रितेश रायपुरे याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील विकास चंपालाल बारेला रा. विमानतळ जवळ हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. मयत प्रितेशचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच सदर ठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, निलेश पाटील, मुदस्सर काजी, असीम तडवी, कुसुंबा पोलीस पाटील राधेश्याम पाटील अशांनी जखमीला उपचार कामी ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे रिक्षामध्ये टाकून पाठवले होते. पुढील कारवाई पो.कॉ. रतिलाल पवार करीत आहे.

Protected Content