माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे; डॉ. सतीश पाटील (व्हिडिओ)

जळगाव सचिन गोसावी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, शहराध्यक्ष मंगला पाटील, संजय पवार, सुनील माळी, कल्पिता पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी माजी  महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेत असल्याचे  जाहीर केले. यावेळी विनोद देशमुख यांना नियुक्ती पत्र, शाल, श्रीफळ देवून पक्ष प्रवेश देण्यात आला. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी विनोद देशमुख यांची ताकद संघटनेला मिळणार असून संघटना कशा प्रकारे प्रभावीपणे काम करेल याचे प्रयत्न विनोद देशमूख व  त्यांचे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात  अनेक चांगले निर्णय आघाडी सरकारतर्फे घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले असून यातून काही ठिकाणी शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न  करीत आहे.  उद्यापासून मुंबईत विधिमंडळाचे दोन दिवशीय अधिवेश होणार आहे.   शेतकऱ्यांच्या प्रश्नाला  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बगल देण्याचा प्रयत्न करीत असून प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यचा आरोप डॉ. पाटील यांनी केला.  भाजप कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा देखील आरोप डॉ. पाटील यांनी केला.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1208528476239130

 

Protected Content