एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

जळगाव प्रतिनिधी । शासनाने ‘‘One Nation-One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी सूचना दिल्या आहेत. यासाठी 12 सप्टेंबर रोजी ‘‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस ’’ साजरा करणेत येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.

पोर्टेबिलिटीद्वारे लाभार्थ्यांस देशात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात त्याचे हक्काचे धान्य घेणे शक्य होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांने आपला आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॅास मशिनच्या सहाय्याने आधारचे बायोमेट्रीक प्रमाणीकरण करून घेतल्यास धान्य घेणे शक्य होणार आहे.

पोर्टेबिलिटीबाबत शासनाकडून प्राप्त पोस्टर्सच्या नमुन्याद्वारे तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालये, बँका, पोस्ट ऑफीस, मार्केट कमिटी, बाजारपेठा इ. ठिकाणी पोस्टर्स लावून जनजागृती करणेत येणार आहे. जळगाव जिल्ह्यात आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. विभागीय आयुक्त यांचे हस्ते पोर्टेबिलिटी पोस्टर्सचे अनावरण करणेत आले.

या प्रसंगी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव, डॅा. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव, प्रविण महाजन, अपर जिल्हाधिकारी, जळगाव, राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव, सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव, प्रसाद मते प्र. उपविभागीय अधिकारी, जळगाव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार याप्रसंगी उपस्थित होते.

Protected Content