बीएचआर संचालकांच्या जामीनावर १२ जानेवारीला अंतीम युक्तीवाद ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांनी आधी ६१ तर आज १४ अशा एकूण ७५ खटल्यांमध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर आज सरकारी पक्षातर्फे खुलासा सादर करण्यात आला असून न्यायालयाने याबाबत १२ जानेवारी रोजी अंतीम युक्तीवाद करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत. जिल्हा न्यायालयाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी याबाबतची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली.

या संदर्भात माहिती देतांना विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके म्हणाले की, बीएचआर संचालकांच्या विरूध्द दाखल करण्यात आलेले सर्व खटले हे जळगाव जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. या अनुषंगाने २०१५ पासून आजवर दाखल करण्यात आलेले जवळपास ७५ खटले हे जिल्हा न्यायालयात चालविण्यात येत आहेत.

यातील ६१ खटल्यांमध्ये याआधी जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर आज नव्याने १४ गुन्ह्यांसाठी सर्व संचालकांनी अर्ज दाखल केले आहेत. यावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी बाजू मांडली. यावर न्यायाधिशांनी १२ जानेवारी रोजी जामीन अर्जावर अंतीम युक्तीवाद होईल असे जाहीर केल्याची माहिती अ‍ॅड. केतन ढाके यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा अ‍ॅड. केतन ढाके यांनी दिलेली माहिती.

https://www.facebook.com/508992935887325/videos/3100648560038102

Protected Content