ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । ग्रामपंचायतींचे उमेदवार नामनिर्देशनापासून पंचित राहू नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (ऑफलाईन ) रवीकारण्याचा व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ ३० डिसेंबररोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२o या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक राज्यात होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवे्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे.

संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २३ ते ३० डिसेम्बर २०२० असा आहे. या कालावधीत संगणकप्रणालीव्दारे ३,३२,८४४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सव्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीय वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. असे आदेश देण्यात आले आहेत पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थैध मनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये आर ओ लॉग इन मधून भरुन घेण्यात यावे.असे सांगण्यात आले आहे

Protected Content