जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरूध्द अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा !

जामनेर प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या विरोधात तोफ डागणारे जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लाऊन देण्यासह विनयभंग केल्या प्रकरणी बाल लैंगीक कायद्याच्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा गुन्हा श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे दाखल झाला असून शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग झाला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

पारस ललवाणी हे माजी जलसंपदा मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक समजले जातात. मध्यंतरी ईडी-सीडी वरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यांच्या आरोपांना उत्तर देतांना आ. महाजन यांच्या समर्थकांनी पारस ललवाणी यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याचा पलटवार केला होता. यानंतर काही दिवसांनी हा वाद संपुष्टात आला होता. यानंतर आता पारस ललवाणी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात एका अल्पवयीन मुलीने फिर्याद दिलेली आहे. यात म्हटले आहे की, २०२०च्या दिवाळीचे अगोदर अंदाजे ८ ते १० दिवसापुर्ण मी मा़झे मानलेले मामा सुनिल कोचर रा.सिल्लोड औरंगाबाद हे श्रीरामपूर येथे येवून मला त्यांचे घरी सिल्लोडला घेऊन गेले होते. मी त्यांच्या घरीच असतांना पारस ललवाणी हे तिथे आले. ते घरात बसलेले असतांना मी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले त्यांनी मला माझे नांव विचारले असता मी नांव सांगून मी घरात निघून गेले. त्यानंतर पारस ललवाणी हे थोड्या वेळाने घरातून निघून गेले. त्यानंतर सुनिल कोचर यांनी फोन करून तिच्या वडिलांना सांगितले की माझ्या लग्नासाठी जामनेर येथून स्थळ आले आहे. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी माझे वडील सिल्लोडला आले व मामा ऐवून परत आमचे घरी श्रीरामपूर येथे आले. तेव्हा माझे लग्नाबाबत बहिलांनी आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली की, ती अजून लहान आहे. तिचे शिक्षण चालू आहे व आईने माझे लग्नाला विरोध केला करिता माझे आई व वडिलामध्ये भांडण झाले होते.

दिवाळी नंतर अंदाजे ८ दिवसांनी मी, वडील व आई असे तिथे आम इंडिगो सीएस या गाडीने सुनिल कोचर यांचे परी सिल्लोड येथे गेलो व तेथून सुनिल कोचर यांचे सोबत आम्ही सर्वजण जामनेर येथे विकास ललवाणी यांचे घरी गेली. त्यानंतर पारस ललवाणी यांनी त्यांचे पर वगैरे दाखविले व मुलाला पण पाहून प्या असे म्हणून मुलगा नामे वृषभ विकास समवाणी यास आम्हाला दाखविले. त्यावेळेस तो काहीही न बोलल्याने तो तोतरा आहे हे माझ्या लक्षात आले नाही. त्यानंतर आम्ही सुनिल कोचर यांना त्यांचे घरी सिल्लोड येथे सोडून आमचे श्रीरामपूर येथे घरी निघून आलो. त्यानंतर माझी आई ज्योती हिने माझे लग्न करू नये म्हणून वडील चंदुलाल कोठारी यांना विनंती केली असता वडीलांनी परत माझ्या आईला मारहाण केली. यानंतर माझे वृषभ ललवाणी यांच्यासोबत ९ डिसेंबर २०२० रोजी लग्न लाऊन दिले.

यानंतर एके दिवशी पारसमल झुंबरलाल ललवाणी हे माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनयभंग केला. याबाबत कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तुला त्यांच्यासोबत संबंध ठेवावे लागतील असे सांगत दबाव टाकला. यानंतर तिचा सासरी छळ सुरू झाला. यामुळे या मुलीने श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे फिर्याद दाखल केली. यात सावत्र वडील चंदूलाल सुहालाल कोठारी, मानलेले मामा सुनील कोचर (रा. सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद); चुलत सासरे पारस झुंबरलाल ललवाणी; पती वृषभ विकास ललवाणी, सासरे विकास ललवाणी, दीर भावेश ललवाणी व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यात पारस झुंबरलाल ललवाणी यांच्यासह इतरांच्या विरोधात भादंवि कलम ३५४-अ; पोक्सो कलम-१२; बालविवाह प्रतिबंधक कायदा ११ प्रमाणे गुरनं १२२/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक किशोर पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Protected Content