कौटुंबिक भांडणातून पतीला कुकर मारून विहिरीत उडी घेतलेल्या महिलेला वाचविण्यात यश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे पती पत्नीचे जोरदार भांडण झाल्यावर पत्नीने घरातील कुकर नवऱ्याच्या चेहऱ्यावर फेकून मारला. यामुळे नवरा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसरीकडे, पत्नीने गावातील ९० फूट खोल विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ग्रामस्थांच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले.

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी ४५ वर्षीय महिलेचा पती रविवारी 14 एप्रिल रोजी संध्याकाळी दारू पिऊन घरी आला. त्याने भांडण सुरु केले. अखेर महिलेने सहनशक्ती संपवून घरातील कुकरचं थेट पतिराजाच्या चेहऱ्यावर मारून फेकला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या भावाने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे मंगळवारी १६ एप्रिल रोजी सकाळी नवरा घरी परत येईल आणि आपल्यला मारेल या भीतीपोटी अखेर दुपारी २ वाजता पत्नीने गावाबाहेरची विहीर गाठली. अन थेट उडी मारली. मात्र विहिरीत पाणीच नव्हते. ती तिथेच रडत बसली. थोड्यावेळाने तिचे नातेवाईक तिला शोधत आले. ती विहिरीत दिसताच त्यांनी ग्रामस्थांना बोलाविले. कोणीतरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी सिद्धेश्वर डापकर, चालक रविंद्र चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने महिलेला दोर बांधून सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून आत्महत्यांबाबत मन परिवर्तन केले. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Protected Content