भांबर्डी गावात पाणी सोडणाऱ्या वालमनवर धारदार शस्त्राने वार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भांबर्डी गावात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या वालमन सोबत गावातील काही जणांनी वाद घालून एकाने मागून धारदार शस्त्राने वारून जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. जखमी झालेल्या वालमनला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत धरणगाव पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भांबर्डी ग्रामपंचायतीमध्ये दगडू लहू शिलावत (वय ५०) हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहे. तेच गावात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवार १६ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शिलावत हे पाणी सोडण्यासाठी जात असतांना गावातील काही जणांनी पाणी सोडण्याच्या कारणावरुन त्यांच्यासोबत वाद घातला. या वादामध्ये मागून एका जणाने धारदार शस्त्राने दगडू शिलावत यांच्या पाठीवर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दगडू शिलावत हे गंभीर जखमी झाल्याचे कळताच ग्रामस्थांसह त्यांच्या कुटुंबियांनी लागलीच त्यांना खासगी वाहनातून धरगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठिक आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content