पंतप्रधान मोदींच्या पत्नी जसोदाबेन जळगावात : ओंकारेश्‍वर मंदिरात केली पूजा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी शनिवारी शहरातील ओंकारेश्‍वर मंदिरात पूजा-अर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन या शनिवारी जळगावात होत्या. त्या यात्रेनिमित्त जगन्नाथपुरी येथे जात आहेत. या दरम्यान, जळगावात त्या थांबल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी ओंकारेश्‍वर मंदिरात पूजन केले. येथे सुमारे एक तास त्या होत्या. यानंतर त्या शेगाव येथे रवाना झाल्या.

दरम्यान, जसोदाबेन मोदी यांच्या सोबत त्यांची बंधू-भगिनी आणि सुरक्षारक्षक होते. ओंकारेश्‍वर मंदिरात त्या दाखल झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने जुगलकिशोर आणि आशा जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

Protected Content