मद्यधुंद टोळक्याचा धिंगाणा; हॉटेलची तोडफोड, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील हॉटेल नैवद्य समोर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्यांसोबत हुज्जत घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी केली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अनोळखी ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील काव्य रत्नावली चौकात सायंकाळच्या सुमारास अबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने बसलेले असतात. तसेच त्याठिकाणी काही बँक असून हॉटेल देखील आहेत. बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हॉटेल नैवेद्यजवळ काही तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालीत होते. यावेळी तेथून जाणाऱ्या तरुणींसह नारिकांना त्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यासोबत हुज्जत देखील घातली. दरम्यान, काही नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण देखील केली. हा वाद सुरु असतांना हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्यांच्या दिशेने ते टोळके आले. त्यांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना हॉटेल चालकांनी अडविले. यावेळी त्यांना देखील त्या मद्यधुंद टोळक्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या मारहाणीत यामध्ये आशिष जोशी, राहुल जोशी व विवेक जोशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परंतु तो पर्यंत मद्यपी तरुण तेथून पसार झाले होते. याप्रकरणी अशिष जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अनोळखी ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content