जळगावात १७ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सव’

Bahinabai Festival

जळगाव प्रतिनिधी । खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२० याचे सहाव्या वर्षाचे आयोजन दि. १७ ते २१ जानेवारी २०२० बॅरिस्टर निकम चौक सागर पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

बहिणाबाई महोत्सव २०२० शुभारंभ
दि.१७ जानेवारी सायं ५:३० वाजता सागर पार्क जळगांव येथे विविध शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी विविध महिला मंडळे सामाजिक संस्था उपस्थित राहणार आहे. उद्घाटन सोहळया प्रसंगी ढोल पथक, शालेय विदयार्थ्यांचे लेझीम पथक तसेच विविध वादय प्रकाराने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.

महिला बचत गटांचा महत्वपुर्ण सहभाग
महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काच व्यासपीठ निर्माण व्हाव त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उन्नती व विकास हावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवुन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद पाहता या महोत्सवात जळगांवसह खान्देशातील २00 गट खान्देशा बाहेरील नामवंत अशी ६६ महिला बचत गट अशी २६६ बचत गटांना नाममात्र दरात या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यकमाची मेजवानी
प्रामुख्यान खान्देशातील लोककला व लोककलावंतांच्या जतन व संवर्धनाच्या प्रकियेत बहिणाबाई महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लग्नगीते, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहिणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता या वर्षी अंदाजे १००० शालेय व महाविद्यालयीन युवक या मंचावर आपली कला सादर करणार आहे. खान्देशातील लोककलेसोबतच महाराष्ट्रातील नामवंत अशी लोककलावंतांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे महाराष्ट्रासह देशभरासह परदेशात जावून शाहीरी पोवाडयाच्या माध्यमातुन प्रबोधन करणारे शाहीर अजिंक्य लिंगायत औरंगाबाद, भारूड सम्राट हमीद सैय्यद अहमदनगर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महिला भारूडकार लोककलावंत चंदाताई तिवाडी पंढरपर यांचा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचा जागर महोत्सवाच्या कालावधीत होणार आहे यासह विविध अशा सांस्कृतिक कार्यकमाचे आयोजन या महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

बहिणाबाई खादय महोत्सव
बहिणाबाईमहोत्सववाचे खास आकर्षण म्हणजे बहिणाबाई खादय महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खादय पदार्थांना जळगांव नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी खान्देशातील विविध खादय पदार्थाचा या महोत्सवाच्या निमित्तान जळगावकर नागरीक आस्वाद घेत असतात .

बहिणाबाई पुरस्कार व बहिणाबाई विशेष सन्मान
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींना दरवर्षी, परस्काराने सन्मानित करण्यात येते खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणा-या 10 व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जळगांव जिल्हयात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या विविध सामाजिक संस्था काम बहिणाबाई विशेष सन्मान देवुन गौरव करण्यात येणार आहे .

महोत्सवास नागरीकांचा प्रतिसाद
गत पाच वर्षात बहिणाबाई महोत्सवास जळगांव शहर नागरीकांसह जिल्हाभरातुन मोठया संख्येन जळगांवकर उपस्थिती देतील असा अंदाज आहे अंदाजे १ लाख नागरीक या महोत्सवाला भेट देतील असा अंदाज असुन त्यानुसार संपुर्ण महोत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे.

बहिणाबाई महोत्सव ५ वर्षात काय साध्य झाले
• गत पाच वर्षात महिला बचत गटांची ४ कोटी ४५ लाखांची आर्थिक उलाढाल
• गत पाच वर्षात महोत्सवाचे आयोजन खर्च प्रती वर्षी १५ लाख याप्रमाणे एकुण 5 महोत्सवाचा आयोजन खर्च ७५ लाख
• गत पाच वर्षात महाराष्ट्रातील नामवंत लोककलावंतांचा सहभाग
• गत पाच वर्षात सिनेतारका चित्रपट कलावंत व नाटयकलावंतांची महोत्सवास उपस्थिती
• गत पाच वर्षात जळगांव जिल्हयातील शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक संस्था यांचा लक्षनिय सहभाग
• गत पाच वर्षात खान्देशासह महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येन नागरीकांची उपस्थिती
• गत पाच वर्षात खान्देशासह महाराष्ट्रात नावारूपाला आलेली महोत्सव बहिणाबाई महोत्सव

बहिणाबाई महोत्सव पर्व सहावे वैशिष्टये
यावर्षीच्या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील नामवंत चित्रतारका कलावंत यांची उपस्थिती लोककलेच जतन व संवर्धन करणारा लोकउत्सव म्हणजेच बहिणाबाई महोत्सव २०२० राज्यभरातील नामवंत लोककलावंतांचा सहभाग महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध भारूड लोककलावंत साहित्य अकादमी पुरस्कार कलावंत चंदाताई तिवाडी यांचा रंगु भारूडाच्या रंगी भारूडाचा कार्यकम ह.भ.प. हमीद सेय्यद अहमदनगर तसेच युबा शाहिर अजिंक्य लिंगायत औरंगाबाद यांचा महाराष्ट्राची लोकसंस्कृती सांगणारा लोकरंग महाराष्ट्राच्या हा कार्यक्रम सादर होणार आहे . गण गवळण शाहिरी पोवाडा, लावणी आदीसह विविध लोककलेचा जागर या महोत्सवात होणार आहे.

फॅशन शो आपल्या संस्कृतिचा साजेसा फॅशन शो या महोत्सवात होणार आहे साज ब्युटी पार्लर यांच्या संचालिका अर्चना जाधव यांच्या वतीन या फॅशन शोचे सादरीकरण होणार आहे. रेसिपी शो या महोत्सवाचे विशेष आकर्षण असुन श्रीमती शैला चौधरी यांच्या वतीन खान्देशातील विविध खाद्य पदार्थाचे सादरीकरण होईल. या महोत्सवात महिलांसाठी रांगोळी, मेहंदी स्पर्धेसह हळदी कुंकु चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Protected Content