साक्री येथील मेंढपाळ करणाऱ्या मतिमंद तरुणाचा यावल शिवारात आढळला मृतदेह

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळीच्या यावल शिवारात असलेल्या शेतात मेंढ पालन करणाऱ्या एका मतिमंद व तीन दिवसापासुन बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह आहे. याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल शिवारातील बाळू वाणी यांच्या शेतात सोनु कोळपे (वय ३० वर्ष) राहणार ह . मु .साकळी ता. यावल, (मुळ राहणार वाघापुर बेहरगाव फाटा तालुका साक्री जि. धुळे) हा तरुण २४ फेब्रुवारी रोजी शनिवारपासुन मतिमंद अवस्थेत साकळी येथे राहात असलेल्या ठिकाणाहून निघुन गेला होता. दरम्यान तीन दिवसानंतर २७ फेबुवारी मंगळवार रोजी बाळू वाणी यांच्या यावल शिवारात शेतात सोनु कोळपे हा मृत अवस्थेत मिळुन आला.

या बाबत मयताचे वडील देविदास तुकाराम कोळपे (वय ६५ वर्ष) राहणार वाघापुर तालुका साक्री यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास यावलचे प्रभारी अधिकारी हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे. मयत सोनु कोळपे याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट होऊशकले नाही. त्याच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Protected Content