बामणोद येथील वैष्णवी केटरर्सकडे वांग्याच्या भाजीच्या मागणीत वाढ

बामणोद,ता. यावल, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत साध्या पद्धतीने लग्न करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे मोठे लग्न समारंभ हे रद्द करण्यात आल्याने लोकांना यावर्षी वांग्याच्या भाजीचा स्वाद घ्यायला मिळत नसल्याने वांग्याच्या भाजीची मागणी वैष्णवी केटरर्सकडे वाढली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी स्वतःहून वैष्णवी केटरर्सचे केशव भोरटक्के यांच्याकडे वांग्याच्या भाजीची मागणी केली आहे. परिसरातील नागरिकांच्या वांग्याची भाजी मागणीनुसार भोरटक्के हे भाजी बनवत आहे. विशेष म्हणजे भोरटक्के यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता आजुबाजुच्या गावातील नागरिक त्यांच्याकडे वांग्याची भाजी घेण्यासाठी येत आहेत. वांग्याची भाजी विक्री करतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाटप करण्यात येत आहे. भाजी देतांना मास्क वापरून ग्राहकांना सॅनिटायझ करून देण्यात येत आहे. ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून फोनवरून ऑर्डर स्वीकारली जात आहे.

Protected Content