पाचोऱ्यात महात्मा फुले यांच्या प्रलंबित स्मारकासाठी समाजमन एकवटले

9e53fa61 3175 4f9a a3a9 de9059211b3e

पाचोरा, प्रतिनिधी | शहरात स्टेशन रोड न.प. जीन येथे नियोजित जागेवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपासून पाचोरा नगरपरिषदेकडे प्रलंबित आहे. याबाबत आज (दि.३०) हुतात्मा स्मारक येथे सर्व पक्षीय बहुजन समाजाची बैठक होवून एक मताने स्मारक होणेबाबत पुन्हा ठराव केला गेला आहे.

 

वेळोवेळी येथील माळी समाजासह सर्व बहुजन व पुरोगामी संघटनांनी आवाज उठवला आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन व येथील नगरसेवक विकास पाटील यांनी नगरपरिषदला याबाबत आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन दिले होते. पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने व विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यावतीने, हे स्मारक होणे ही काळाची गरज आहे, असे सांगून लवकरच हे स्मारक करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले. पुढील वर्षीची ज्योतिबा फुले यांची जयंती येण्याआधीच नियोजित जागेवर स्मारक नक्की उभारेल जाईल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनीही यावेळी दिले.

या बैठकीला शहरातील नगरसेवक विकास पाटील, अनिल महाजन, दिलीप प्रभाकर शिंपी, विठ्ठल महाजन, नाना मोतीराम महाजन, युवराज महाजन, संतोष महाजन, नाना पंढरीनाथ महाजन, संजय एरंडे, प्रवीण कानडे, निलेश बोरसे, रोहित महाजन, कैलास महाजन, चिंधु मोकळं, नगरसेवक वासू आण्णा महाजन, शंकर भिला महाजन, सुनील महाजन, नगरसेवक सतीश चेडे, विशाल हटकर, राकेश महाजन, महेश माळी, सुनील महाजन, लक्ष्मण पाटील तसेच स्वराज ग्रुप व सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  सर्व पुरोगामी संघटनांनी या बैठकीला पाठींबा दिला होता.

Protected Content