पाचोरा ते जामनेर रेल्वे पुन्हा सुरू करा – पीजे बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन

पाचोरा प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केलेली पाचोरा ते जामनेर (पी.जे.) रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी पीजे बचाव कृती समितीच्या वतीने पाचोरा, जामनेरसह इतर पाच गावात एकाच वेळी आज (दि. १५) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

या धरणे आंदोलनास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वकील बार असोसिएशन, सराफ असोसिएशन, डाॅक्टर्स असोसिएशन, एकता अॅटो चालक – मालक संघटना, पाचोरा तालुका शिक्षण संस्था, विद्यार्थी संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला असुन पाचोरा पिपल्स बॅंकेसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात कृती समितीचे खलील देशमुख, विलास जोशी, अॅड. अविनाश भालेराव, पप्पु राजपुत, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, अॅड. आण्णा भोईटे, सुनिल शिंदे, प्रा. गणेश पाटील, मनिष बाविस्कर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, रणजीत पाटील, अनिल (आबा) येवले सह पीजे बचाव कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!