साकळी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन ट्रॅक्टरचे लोकार्पण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत कार्यालयाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन ट्रॅक्टर खरेदी केले आहे. या ट्रॅक्टरचे पूजन नुकतेच साकळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, यावल कृऊबाचे माजी संचालक तथा सरपंचपती विलास पाटील, साकळी ग्राम पंचायत सदस्य खतीब तडवी, सैय्यद अशपाक सैय्यद शौकत, रुखमाबाई निळे, शरद बिऱ्हाडे, माजी ग्राम पंचायत सदस्य मुसेखाँ पठाण, सय्यद अहमद सय्यद मिरा, दिपक पाटील, नितिन फन्नाटे, प्र. ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी, वरिष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी, कनिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली, लिलाधर मोरे, विजय बाविस्कर यांचेसह नागरिकांची उपस्थित होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राम पंचायतचे ट्रॅक्टर खराब झालेले होते. त्यामुळे गावाची स्वच्छता मोहीम थांबली होती व साफसफाईच्या कामात केरकचरा वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत होती. गावाच्या स्वच्छतेच्या समस्याची बाब लक्षात घेऊन सदरील कचरा वाहतुकीची अडचण दूर व्हावी, म्हणून जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील ( छोटु भाऊ ) तसेच साकळी ग्रामपंचायतच्या सरपंच सुषमा पाटील, उपसरपंच वसिम खान यांच्या मार्गदर्शनाने नविन ट्रॅक्टर खरेदी करण्यात आलेली आहे. नविन ट्रॅक्टरची व्यवस्था झाल्याने गावातील स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी युद्धपातळीवर साफसफाई कामात मोठी मदत होणार आहे.

 

Protected Content