Home क्राईम बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने लांबविले

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने लांबविले


धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साकरे गावातील एकाचे बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ४९ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शकील गुलाब खाटीक (वय-४८, रा. साकरे ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १५ ऑक्टोबर रोजी ९ वाजता त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी पेटीतून १२ हजारांचा रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ४८ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. त्यानंतर शकील खाटीक यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound