शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनोळखी अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एका अनोळखी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवावी असे आवाहन शनीपेठ पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पाटील हे करीत आहे।

Protected Content