अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाऊस सुरू असतांनाही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
मंत्री अनिल पाटील यांना विशेष शुभेच्छा म्हणून असंख्य जेष्ठ श्रेष्ठ व तरुण मंडळींनी रक्तदान करुन आरोग्य हिताचे कार्य केले.बाजार समितीत मंत्र्यांची वहीतुला व वृक्षारोपण करण्यात आले. मंत्री अनिल पाटील यांचा यंदाचा वाढदिवस अतिशय वेगळ्या थाटात दिसून आला शहरात प्रभागात विविध रस्त्यांवर तसेच ग्रामिण भागात गावोगावी शुभेच्छांचा बॅनर झळकले होते. सर्वाना भेट देता यावी यासाठी बाहेरचे सत्काराचे सर्व कार्यक्रम रद्द करत मंत्री पाटील यांच्या निवासस्थानाबाहेरच भव्य वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात आला होता.
मंत्री पाटील हे बाजार समितीला नेहमीच बळकटी देत असतात म्हणून वाढदिवसाच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता बाजार समितीतील सर्व व्यापारी बांधवानी वाजतगाजत मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी अचानक भेट देऊन जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सात पासूनच शुभेच्छा देणार्यांची रीघ लागली होती.शिस्तीने रांगा लावून त्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या.जोरदार पाऊस असताना देखील केवळ आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रेमापोटी ग्रामिण भागातील शेतकरी व इतर लोक देखील आवर्जून उपस्थित झाले होते. जळगाव व धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या परिसरातून देखील असंख्य मान्यवरांनी देखील उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्यात.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिला भगिनींना मोठा दिलासा दिला आहे.यामुळे महिला भगिनींमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.मंत्री अनिल पाटील हे राज्य शासनाचे कॅबिनेट मंत्री असल्याने व आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ मिळावा म्हणून गावोगावी व शहरात प्रत्येक प्रभागात ते सुविधा केंद्र सुरू करीत असल्याने शेकडो महिला भगिनींनी या अभिष्टचिंतन सोहळ्यात हजेरी लावुन लाडका भाऊ म्हणून मंत्री पाटील यांचे औक्षण केले.एवढेच नव्हे तर दादा आमदार झाल्यापासून अमळनेर मतदारसंघात महिला भगिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचेही सांगत आभार व्यक्त केले.
मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन याच ठिकाणी करण्यात आले असल्याने सुमारे १०१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून अनोख्या पध्दतीने त्यांना शुभेच्छा दिल्यात.विशेष म्हणजे यात काही महिलांनी देखील रक्तदान केले.यासाठी अमळनेर येथील जीवनश्री रक्तपेढी व धुळे येथील जीवन ज्योती रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.शिबिरासाठी देविदास देसले व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बाजार समितीत वहीतुला व वृक्षारोपण
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे विद्यार्थी हितासाठी वहीतुला व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी सभापती अशोक पाटील,उपसभापती सुरेश पिरण पाटील व सर्व संचालक मंडळ आणि व्यापारी बांधव,हमाल,मापाडी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तर दिव्यांग बांधवाना आमदार निधीतून दिव्यांग साहित्य वाटप करण्यात आले.
सर्व पक्षीय मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव,,,
मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच सर्व मंत्री महोदय व विरोधी पक्षाचे नेते व आमदार; जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्यात.तर जिल्ह्यातील काही जेष्ठ व युवा नेत्यांनी प्रत्यक्ष अमळनेरात येऊन शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणार्यांची गर्दी सुरूच होती.असंख्य अधिकारी, नोकरदार वर्ग,व्यापारी,लघु व्यावसायिक,शिक्षक मंडळी,डॉक्टर, वकील शेतकरी बांधव,विविध संघटना, मंडळे, सर्व समाजाचे पंच मंडळ पदाधिकारी उपस्थित झाले होते.यादरम्यान मंचावर काहींनी गितगायन तर काहींनी शेरो शायरी करून कार्यक्रमात रंगत आणली.सायंकाळी डी जे च्या तालावर तरुणाईने ठेका धरला. काहींनी मनोगत व्यक्त करून मंत्री पाटील यांच्या विकास कामांचे कौतुक करत पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याने जनता मंत्री पाटील यांना कधीही विसरू शकणार नाही अश्या भावना व्यक्त केल्यात.एका जेष्ठ मान्यवराने या मतदारसंघात खरा विकासपुरुष अनिल दादाच असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनिल दादाच फक्त हाच आमचा नारा असेल असे जाहीरपणे सांगितले.