पोस्ट ऑफिस समोरून दुचाकी लांबविली; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातून सेवानिवृत्त जवानाच्या ताब्यातील मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, गजानन पुना बडगुजर (वय-५२) रा. माहेजी ता. पाचोरा जि. जळगाव यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ बीआर ७०३९) क्रमांकाची दुचाकी त्यांचे जावाई निवृत्ती पुंडलिक भवरे (वय-३७) रा. पिंप्राळा रोड जळगाव यांच्या ताब्यात दिली आहे.  निवृत्ती भवरे हे भुसावळ येथे नोकरीला असून घराच्या कोरकोळ कारणासाठी दुचाकीचा वापर करतात. १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते शहरातील पांडे चौकातील मुख्य टपाल कार्यालयात कामाच्यानिमित्ताने आले होते. दुपारी दीड वाजता काम आटोपून ते दुचाकीजवळ गेले असता दुचाकी मिळून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून  न आल्याने जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दिली. गजानन बडगुजर यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे. 

Protected Content