शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयाची घंटा वाजली व शाळा भरली.
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात घंटा वाजली आणि शाळा भरली शासनाच्या आदेशानुसार इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतची शाळा ही दिनांक 15 जून 2022 पासून सुरू करण्यात आली.
यावेळी शाळेत आलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी उदार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प देऊन केले, शाळा भरण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती ही यावेळी दिसून आली विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संदर्भात मार्गदर्शक सूचना या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. उदार यांनी दिल्या व इथून पुढे शाळेचे कामकाज कशा पद्धतीने चालणार याबद्दल माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी उदार ,उपमुख्याध्यापक ए.बी ठोके ,सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती या ठिकाणी होती.संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद ,सहसचिव दीपक गरुड वस्तीग्रह सचिव कैलास देशमुख, यांनी देखील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके प्रदान करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर शाळा भरल्याचा उत्साह दिसून आला.