जिल्हास्तरीय अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

 

भुसावळ, प्रतिनिधी । मराठी भाषा संवर्धनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अभिव्यक्ती व अभिवाचन व्हिडिओ स्पर्धा २०२१ चा निकाल ऑनलाईन जाहिर करण्यात आला. ५४० स्पर्धक विद्यार्थ्यांमधून २५ विद्यार्थी विजेते ठरले आहेत. 

डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा समन्वयक म्हणून मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील कामकाज केले. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. अनिल झोपे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात येवून त्याची युट्यूब लिंक सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना पाठविण्यात आली आहे. विशाखा जोशी यांनी कुसुमाग्रजांची कविता सादर केली. ऑनलाईन समारंभातील प्रास्ताविकात डॉ. झोपे यांनी स्पर्धा घेण्यामागची भूमिका, व्हिडिओ संकलन, स्पर्धेचे परीक्षण याविषयी माहिती सांगितली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. मंजुषा क्षीरसागर, डॉ. राजेंद्र महाजन, प्रदीप पाटील, डॉ. अरूण भांगरे, शैलेश पाटील, सुष्मा इंगळे, विषय सहाय्यक किशोर पाटील, भटू पाटील, डॉ. जगदीश पाटील, विशाखा जोशी, डॉ. नरेंद्र महाले, बी. बी. जोगी, गणेश राऊत, किरणकुमार जाधव, अविनाश बागुल, शैलेश शिरसाठ, अनिता परमार यांनी केले. परीक्षकांतर्फे गणेश राऊत व विशाखा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. विजेत्यांची नावे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जाहीर केली. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व वर्षभरासाठी किशोर मासिक तर सहभागी सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी मानले. 

विजेते असे – सर्व विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती स्पर्धेमधील पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या पहिल्या गटात प्रथम देवेंद्र विनोद बडगुजर, द्वितीय रियांश किशोर मोरे, तृतीय काव्यांजली सतीश रघुवंशी, उत्तेजनार्थ आदिती विशाल पाटील व समृद्धी सचिन भास्कर.  

तिसरी ते पाचवीच्या दुसऱ्या गटात प्रथम काव्या शरद पवार, द्वितीय चिन्मयी दिलीप ठाकरे, तृतीय मुग्धा विजय याज्ञिक, उत्तेजनार्थ तेजस्वी शालिग्राम बारी व कल्याणी भगवान पाटील.

सहावी ते आठवीच्या तिसऱ्या गटात प्रथम साक्षी मेघराज शिंदे, द्वितीय प्रणाली विजय वाघ, तृतीय उपलक्ष प्रशांत पाटील, उत्तेजनार्थ आशुतोष कैलास वावगे व प्रांजल अनिल कोठावदे.

नववी ते बारावीच्या चौथ्या गटात प्रथम अनघा विक्रम पाटील, द्वितीय निकिता ईश्वर पाटील, तृतीय सोहम बाळकृष्ण मोराणकर, उत्तेजनार्थ निकिता संदीप पाटील व साक्षी वैभव पाटील.

अमराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभिवाचन स्पर्धेतील सहावी ते आठवीच्या गटात प्रथम श्रावणी प्रशांत बाविस्कर व द्वितीय अनुष्का निलेश दुसे. दिव्यांगांमधून पहिल्या गटात उत्तेजनार्थ करण रवींद्र बाविस्कर, दुसऱ्या गटात उत्तेजनार्थ हर्षाली अंकुश रानडे व तिसर्‍या गटात उत्तेजनार्थ भावेश भगवान पाटील.

 

Protected Content