ऑईल गळतीच्या बहाण्याने कारमधून लांबवली बॅग

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील महाबळ परिसरातील मॉडेल कॉलोनीतील रहिवासी व बजाज कंपनीचे एरिया मॅनेजर निलेश अभिनव विसपुते हे महानगर पालिका इमारतीतून पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी गाडी काढत असताना गाडी मागुन आलेल्या दोन जणांनी त्यांना तुमच्या गाडीतून ऑइल पडत असल्याचे सांगून लक्ष वेधून घेत त्यांच्या गाडीतली बॅग लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

 

या संदर्भात अधिक असे की, निलेश विसपुते हे आपल्या कामानंतर गावात आलेले होते. महानगर पालिका इमारतीतून पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी गाडी काढत असताना गाडी मागुन आलेल्या दोन जणांनी त्यांना तुमच्या गाडीतून ऑइल पडत असल्याचे सांगितले. त्या दोघा भामट्यांवर विश्वास ठेऊन विसपुते यांनी खाली उतरून गाडीचे बोनेट उघडले, तेवढ्या वेळात त्या भामट्यांनी त्यांच्या गाडीत ठेवलेली बॅग घेऊन पोबारा केला. सुदैवाने त्यात पैसे नव्हते, पण कागदपत्रे होती. याबाबत शहर पोलीस स्टेशन मध्ये दुपारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content