पिक विमा योजनेची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार-आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये एकूण ७८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४ हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना टप्याटप्याने लाभ मिळणार होता. त्यातील काही महिन्यापूर्वी ९ हजार शेतकऱ्यांना एकूण रु.३० कोटी ७२ लाख ७२ हजार ५७७ रक्कम वितरीत करण्यात आली असून ९ हजार ६९० शेतकऱ्याच्या खात्यात ५३ कोटी ७० लाख ४२ हजार २४५ इतका पिक विम्याचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

विमा कंपनी मार्फत ११ हजार ३६० शेतकऱ्यांना ओव्हर इशूरन्सच्या नावाखाली पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आला होता. त्याबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पिक विमा रक्कमचा मुद्दा उपस्थित करून विमा नाकारलेल्या ११ हजार ३६० शेतकऱ्याना सुध्दा लाभ मिळावा व ७८ हजार पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी १० हजार६१९ शेतकऱ्यांची प्रकरणे कृषी विमा कंपनीने राज्य शासनाची MRSAC नागपूर या संस्थेमार्फत अवेळी सर्वेक्षण करून घेतल्यामुळे ही प्रकरणे क्रॉप नोट फाउंड म्हणून अपात्र करण्यात आली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी ज्या वेळेस पिक विमा काढला तेव्हा केळी व इतर पिके यांची लागवड केलेली होती. अश्या शेतकऱ्यांनी लागवडीचे पुरावे सादर करावे, असे आवाहन केल्यानंतर त्यापैकी ८ हजार १९० शेतकऱ्यांनी पुरावे सादर केल्यानंतर ६ हजार ६८६ शेतकऱ्यांना पिक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने पात्र ठरवण्यात आले. आणि तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. तसेच पिक विम्याचा लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांना आजपावतो लाभ मिळाला असून, राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा लवकरच लाभ मिळेल असे आ चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Protected Content