शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट द्यावी- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा दुष्काळामुळे संकटात आला आहे. केळी पिक उत्पादकांना नुकसान भरपाईची रक्कम विमाच्याच्या माध्यमातून सरसकट देण्यात यावी, चाळीसगाव सोडून इतर तालुक्यात दुष्काळाच्या सवलती देण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारकडे मागणी केली आहे. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. आज राष्ट्रवादी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जळगाव जिल्ह्यातील बराच भाग हा पाण्यापासून वंचीत आहे. त्यामुळे दुष्काळात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असतांना या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, यासाठी तिनही मंत्र्यांनी ताकद लावावी, आणि जिल्ह्याचा प्रश्न सोडवावा. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे. यात केळी पिक विमा, नुकसान भरवाई, जिल्हा दुष्काळ जाहीर करणे, कापसाला हमी भाव नाही, त्यांना अनुदान देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सुरात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवाव्यात.

Protected Content