महायुतीचे उमेदवार उद्या अर्ज दाखल करतील – डॉ. संजीव पाटील (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 02 at 9.10.58 PM

 

जळगाव, प्रतिनिधी | भाजप सेनेच्या उमेदवारां विरोधात जो ही काम करेल त्यावर पक्ष कारवाई करणार असे महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप ग्रामीण अध्यक्ष डॉ. संजीव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

युती जाहीर झाली असून भाजपच्या पदाधिकारी व सेनेच्या पदाधिकारी यांनी ज्या ठिकाणी युतीचा उमेदवार असेल त्याठिकाणी प्रचार करायचा आहे असे दोघ जिल्हाप्रमुखानी सांगितले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल विचारले असता खडसे यांनी मुलाखत दिली आहे. त्यांचे नाव यादीत होते. उद्या जाहीर होईल असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील हे म्हणाले. जो ही बंडखोरी करेल त्याच्यावर पक्ष कारवाई होईल, त्याला ६ वर्षासाठी निलंबित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्या भाजपाचे गिरीश महाजन, राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण हे तर शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील, किशोर पाटील, सोनवणे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्ह्यात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. संजीव पाटील व गुलाबराव वाघ यांनी केले आहे.

Protected Content