राजुमामांना बदला अन्यथा शिवसेना स्वतंत्रपणे लढणार – महाजन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 27 at 6.05.31 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांची उमदेवारी रद्द करा, अन्यथा शिवसेना स्वतंत्रपणे उमेदवारी करणार असल्याचा इशारा मनपा विरोधी पक्षनेते  सुनील महाजन यांनी आज दिला. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी आज पहिल्या दिवशी एकूण ६७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यात शिवसेनेही दोन उमेदवारी अर्ज विकत  घेतल्याने शिवसेना भाजपा युती बाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेतर्फे अर्ज घेण्याऱ्यांमध्ये डॉ. सुनील महाजन व माजी महापौर विष्णू भंगाळे यांचा समावेश आहे.

भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मदत करूनही वेगवेगळ्या मुद्द्यावर विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांनी शिवसेनेला दिलेला शब्द वारंवार फिरविल्याने आणि शहरात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने आमची त्यांच्याबद्दल नाराजी आहे. म्हणूनच शिवसेनेतर्फे उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. किवा शिवसेना भाजपची युती झाल्यास व ही जागा भाजपच्या वाटेला गेल्यास किमान त्यांनी विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नये. त्यांनी उमेदवार बदलावा अशी आमची मागणी आहे असे मत शिवसेनेचे सुनील महाजन यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून ही जागा शिवसेनेकडे होती. यावेळेस देखील पक्ष श्रेष्ठींकडे या जागेची मागणी केली आहे. मागील पाच वर्षात कुठेलेही विकास काम झालेले नसल्याने जळगावकरांमध्ये आमदारांविषयी नाराजी असल्याने ही जागा शिवसेनेस मिळावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे आहे. विद्यमान आमदारविषयी जनतेची नाराजी पाहूनच आपण ही जागा लढवीत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी देखील अर्ज घेतला आहे. श्री. भंगाळे यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जळगाव विधानसभा शिवसेनेलाच मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. आम्ही मुलाखती देऊन आलो आहोत. जळगाव शहराच्या विकासाच्या
दृष्टीने ज्या काही योजना असतील त्यादृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करू. जळगाव शहरात जे वातावरण निर्माण झाले आहे यात परिवर्तनाची लाट असावी याकडे बघितले जात आहे. युती झाली तर शहरासाठी वेगळे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे श्री. भंगाळे यांनी स्पष्ट केले.

Protected Content