विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । घरात सामान घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेतील माहेर असलेल्या सोनाली कन्हैय्या दहीहंडे (वय-२५) यांचा विवाह उस्मानाबाद येथील कन्हैय्या भिमाशंकर दहीहंडे यांच्याशी सन २०२० मध्ये रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्न झाल्यापासून पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेला माहेरहून दोन तोळ्याची सोन्याची पोत मागणी केली. ती मागणी पुर्ण न झाल्याने पती कन्हैय्या याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर नणंद हिने विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर घरात वस्तू घेण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणण्याचा तगादा लावला, पैसे न दिल्याने पतीसह सासू, सासरे व नणंद यांनी गांजपाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिते जळगाव येथील माहेरी निघून आल्या. मंगळवारी २१ डिसेंबर रेाजी विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती कन्हैय्या भिमाशंकर दहीहंडे, सासू अशा भिमाशंकर दहीहंडे, सासरे भिमाशंकर देविदास दहीहंडे सर्व रा. उस्मानाबाद आणि नणंद नम्रता राहूल जारखंडे रा. जालना या चौघांविरोधात रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका वानखेडे करीत आहे.

Protected Content