Home Uncategorized वर्षभरापासून फरार असलेला आरोपी अखेर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी अखेर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

0
70


भुसावळ प्रतिनिधी । पोटात चाकू खुपसून १३ महिने १४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीस भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी पंचशिल नगरातून अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नागेश बाळु सोनवणे (वय – २३ रा.पंचशिल नगर शर्मा हॉस्पिटल जवळ) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, दि.१४ ऑक्टोंबर रोजी रात्री ११:३० वा.सुमारास फिर्यादी नामे पवन ऊर्फ प्रविण रविंद्र येवले (वय -२४ रा.पंचशिल नगर भुसावळ) यास भुसावळ शहरातील जुने तालुका पो.स्टे जवळील भाजी मार्केट येथे नागेश सोनवणे याने फिर्यादीशी हुजत घालुन शिवीगाळ करुन चाकुने पोटावर मारुन गंभीर दुखापत केली. म्हणुन फिर्यादी यांनी भु.बा.पेठ पो.स्टे ला फिर्याद दिल्याने भाग 5 गु.र.न 516 / 2019 भा.द.वि.क.326,323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तेव्हा पासुन या गुन्हयातील आरोपी हा (१वर्ष, १ महिना,१४ दिवस ) झाले फरार होता.

मात्र, दि. २८ नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरात पंचशिल नगर येथे आरोपी नागेश सोनवणे हा आला असल्याची गुप्त माहीती मा.पो.नि.सो. दिलीप भागवत सर यांना  मिळाल्याने पो. अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे जळगाव, अपर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगाव, उप.पो.अधिकारी सोमनाथ वाघचौरे भुसावळ, पो. निरी.दिलीप भागवत भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ पो.स्टे चे स.पो.नि.अनिल मोरे सर , स.पो.नि मंगेश गोटाले सर सफौ. ग्योसोदीन शेख , कृष्णा देशमुख , तस्लीम पठाण पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे पो.ना रविंद्र बि-हाडे,रमन सुरळकर ,उमाकांत पाटील पो.कॉ विकास सातदिवे,सचिन चौधरी,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे,सुभाष साबळे,योगेश माळी अश्यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ वाल्मीक सोनवणे करीत आहे.

 


Protected Content

Play sound