मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आज रात्री ते शिंदे गटात प्रवेश करतील. वायकर यांच्यावर ईडीची कारवाई सध्या सुरू आहे. त्यांची ईडीने चौकशी देखील केली आहे. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहे. ते ठाकरे गटाचे प्रमुख मानले जात होते. पण आता ठाकरे यांना धक्का बसला आहे.
त्यांचा शासकीय निवासस्थानी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश होणार आहे. वर्षा बंगल्यावर प्रवेशाचा समारंभ आयोजित होणार आहे. ईडीच्या चौकशीला त्रासून रवींद्र वायकर ठाकरे गटाला सोडतील असे भाष्य संजय राऊत यांनी सुध्दा केले होते. त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे ते शिंदे गटात जातील असे राऊत म्हणाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे.जवळपास दीड हजार जण त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतील.