सबगव्हाण खुर्द टोल प्लाझाचे दर कमी करा; स्थानिक नागरिकांची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालय) द्वारे ११ मार्चपासून पारोळा तालुक्यातील सबगव्हाण खुर्द टोल प्लाझाचे दर वाढणार आहे. परंतू पारोळा शहरातील व तालुक्यातील स्थानिक वाहनधारक व नागरिकांनी हे दर कमी करा किंवा प्रति फेरी २०/- रुपये व मासिक १५०/- रुपये एवढे निश्चित करा अशी मागणी केली आहे.

संपूर्ण वृत्त असे की, ११ मार्च पासून रोजी पासून सबगव्हाण खुर्द ता. पारोळा पथकर नाका टोल प्लाझाचा दर लागू करण्यात येणार आहे. परंतू पारोळा व तालुक्यातील स्थानिक रहिवासी असलेल्या वाहनधारकांसाठी ठरवून दिलेला टोल दर प्रति फेरी, मासिक पास ही रक्कम जास्तीची असून जाचक आहे. मालेगावहून धुळे, चांदवड, पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरुन नाशिक येथे जाणे येणेसाठी प्रति फेरी २०/- एवढा टोल आकारला जातो. नाशिक जिल्ह्यासाठी वेगळा दर व जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यासाठी वेगळा दर नियम व न्याय हे संयुक्तिक व योग्य वाटत नाही. राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये स्पष्टपणे तफावत दिसून येत आहे. मालेगावकरांच्या सवलती प्रमाणे व त्याच धर्तीवर पारोळेकरांना देखील २०/- रुपये प्रति फेरी व मासिक पास साठी रुपये १५०/ – एवढी रक्कम आकारणी करुन व ठरवून सवलत उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी स्थानिक वाहनधारकांनी केली आहे. स्थानिक वाहनधारकांना जास्तीचा भुर्दंड न पडता कन्सेशन रेट सवलतीच्या दरात ठरवून लाभ द्यावा धुळे ते पारोळा, पारोळा ते धुळे प्रवास सुखकर होईल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सबगव्हाण तालुका पारोळा या गावाजवळ नवीन टोल नाका आकारणीस सोमवार ११ मार्च पासून सुरवात होत आहे त्यामुळे जळगाव ते धुळे हा प्रवास महागणार आहे टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या आत स्थानिक रहिवाशींना किमान शुल्क आकारणी करावी व टोल दर कमी करण्यासाठी उपमहाप्रबंधक प्रकंल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार साहेब यांना शिवतीर्थ पारोळा येथे निवेदन देण्यात आले यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, महिला संघटना,शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content