पथदिव्यांचे वीज बिल भरण्याचा टाकळी ग्रामपंचायतीपुढे नवाच पेच

 

चाळीसगाव : प्रतिनिधी ।  टाकळी गावातील पथदिव्यांच्या वीज बिलांचा भरणा  आतापर्यंत  जिल्हा परिषदेकडून केला जात असताना आता अचानक महावितरणने ग्रामपंचायतीला  १५ वर्षांपासूनची थकबाकी आताच  भरा   अशी ताकीद दिली आहे त्यामुळे ग्राम पंचायत अडचणीत आली आहे

 

महावितरणच्या या  मनमानीसंदर्भात टाकळी प्र.चा. येथे पत्रपरिषेद घेण्यात आली  टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्ट्रीटलाईट बिल जिल्हा परिषदेच्या नावाने येऊन अध्यापपावेतो जिल्हा परिषदच भरणा करत होती. अचानक महावितरणने २२ मार्चरोजी  लाखोंचे  बिल टाकळी ग्रामपंचायतीला देऊन बिल भरणा करा अन्यथा पथदिवे खंडित करण्याचा इशारा  दिला आहे.

स्ट्रीट लाईट बिल भरण्याची  ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून १५ वर्षाचे थकीत बिल  माथी मारले आहे. या  पत्रकार परिषदेचे आयोजन महाराष्ट्र सरपंच असोसिएशनचे कार्याध्यक्ष व विद्यमान उपसरपंच यांच्या  उपस्थितीत  करण्यात आले.

 

कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात महावितरणने स्ट्रीट लाईट खंडित केल्यास गावात अंधार  होऊन गुन्हेगारी वाढेल यास महावितरण  जबाबदार असेल असे ग्रामस्थांनी  सांगितले.  थकीत बिल कोणी भरावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासकीय स्तरावर होत नाही तोपर्यंत विज पुरवठा खंडित न करण्याची  सुचना देण्याची मागणी किसनराव जोर्वेकर यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील तसेच महावितरणचे मुख्य अभियंता  यांच्याकडे केली आहे. यावेळी सरपंच कविता महाजन, उपसरपंच किसनराव जोर्वेकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Protected Content