Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
40


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लडगाव येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लडगाव येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ८ मार्च रोजी रात्री १० वाजता पिडीत मुलीसह सर्वजण घरात झोपलेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवार ९ मार्च रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवार ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound