Home राजकीय ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार : शरद पवार

ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार : शरद पवार

0
73

मुंबई प्रतिनिधी ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला. 

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, ईडीमार्फत कारवाई म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं पवार म्हणाले. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. 

दरम्यान, पवार पुढे म्हणाले की, आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.

 

 


Protected Content

Play sound