मुंबई वृत्तसंस्था | राज्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आल आहे.
राज्याच्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC) आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, कोविड १९ आणि त्याच्या ओमिक्रोन हा नवा व्हेरीयंट महाराष्ट्रात दाखल झाला असतांना या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन, होतील की ऑफलाईन? त्या वेळेवर होतील की पुढे ढकलण्यात येतील? याविषयी विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल माध्यमावर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यात सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची आणि ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे.
दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के अभ्यास कपात करण्यात आलाअसून उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच या परीक्षेत विचारले जाणार आहेत. असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं.
दहावी बारावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे
15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2
बारावी, दहावीसाठी अनुक्रमे प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत संपन्न होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.