लढा विलीनीकरणापर्यत सुरूच राहणार – एस.टी. कर्मचारी ठाम (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | काल रात्री एस.टी. कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने संपातून माघार घेतली असली तरी जळगावातील संपकरी कर्मचार्‍यांनी आपला संप कायम ठेवला आहे. आमचा लढा विलीनीकरणासाठी असून यावर निकाल होईपर्यंत आम्ही संप करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

 

जळगाव येथील आपली भूमिका मांडतांना सांगितले की, आंदोलकांनी कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेचे अजय गुजर यांनी माघार घेतली आहे. आजपर्यंत २८ संघटनांनी या लढ्यातून माघार घेतली आहे. यातून कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना माघार घेणारी २९ वी संघटना ठरली आहे. मात्र, एस.टी. महामंडळाचे शासनात विलणीकरण होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अनिल गुजर यांना ३ तारखेला देण्यात आलेल्या नोटीसीप्रमाणे हा संप त्याच्या कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने मागे घेतला आहे. आंदोलक ५२ शहीद कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यांत असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अविरत लढा देऊ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. अजय गुरज यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आम्ही अमिषाला बळी पडणाऱ्या अजय गुजर यांच्या पाठीशी नाही. विलणीकरण च्या लढ्यात ज्या बांधवांनी आहुती दिली त्यांच्या दुखवट्यांत आहोत. अजय गुजर यांनी माघार घेतली याबाबत त्याचे आभार व्यक्त करत अशांमुळे एकवटलेले कर्मचारी विभक्त झाले असते अशी भावना व्यक्त केली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/957656538518498

 

Protected Content