दोन दुचाकीच्या धडकेत मायलेक गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकाकडून आदर्शनगराकडे जात असलेल्या माय-लेकाच्या दुचाकीला समोरून येणा-या भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात माय-लेक जखमी झाले असून ही घटना आरटीओ कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की ,आदर्श नगरामध्ये वनिता सुरेश अग्रवाल या कुटूंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास त्या मुलगा रौनक याच्यासोबत काव्यरत्नावली चौकाकडून घरी जात होत्या. आरटीओ कार्याजवळ विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने अग्रवाल यांच्या दुचाकीला समोरून धडक देवून पसार झाला. या अपघातात अग्रवाल व त्यांचा मुलगा दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर सोमवारी १७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार धडक देणा-या दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content