महाराष्ट्र दिनी तेजस पाटील यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान !

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांना महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठित जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराची विशेष बाब म्हणजे गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यावल तालुक्यातील एका युवकाला जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. यामुळे यावल तालुक्यातील शिरसाड गावासह संपूर्ण तालुक्याचे नाव जिल्हा प्रशासनात उंचावले गेले आहे.

तेजस पाटील यांना मिळालेल्या या महत्त्वपूर्ण पुरस्काराबद्दल रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन पांडूरंग सराफ, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविंद्र उर्फ छोटू पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष सागर कोळी, उमेश बेंडाळे, डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content