Home Cities यावल यावल तालुक्यातील अधिकाऱ्यांचे मुख्यालयाकडे दुर्लक्ष? नियम धाब्यावर ठेवून बाहेर वास्तव्य; शिस्तभंगाच्या कारवाईची...

यावल तालुक्यातील अधिकाऱ्यांचे मुख्यालयाकडे दुर्लक्ष? नियम धाब्यावर ठेवून बाहेर वास्तव्य; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

0
4

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख्यालयात वास्तव्य करण्याच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप होत आहे. नेमणुकीच्या ठिकाणी शासकीय निवासस्थाने उपलब्ध असतानाही अनेक अधिकारी आपल्या सोयीनुसार मुख्यालयाबाहेर वास्तव्यास असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामांना विलंब होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यात विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये असून, येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे नियमानुसार बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून राहण्यासाठी सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही काही अधिकारी मुख्यालयाबाहेर वास्तव्य करून शासकीय वाहनांनी ये-जा करीत असल्याचे चित्र असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
अधिकारी मुख्यालयात उपलब्ध नसल्यामुळे विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक महत्त्वाच्या कामांना विलंब होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यपरायणता आणि शिस्तीचे पालन अपेक्षित आहे. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा मुख्यालयाबाहेर वास्तव्य करण्याबाबत लागू असलेल्या सेवा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांची चौकशी होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील मुख्यालयाबाहेर वास्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशासनाने तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चौकशी करून दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Protected Content

Play sound