रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे रावेर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. या निर्णयाच्या समर्थनार्थ रावेर तालुक्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा चिटणीस राजन लासूरकर, रावेर (सावदा) तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, रावेर तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष महेश चौधरी, जिल्हा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह बाळा आमोदकर, लखन महाजन, चंदू पाटील, आशा सपकाळे, नलिनी पंत, आशा मोरे, चेतन पाटील, मनोज श्रावग, पवन चौधरी, अनंत महाजन, राम शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांची खरी आकडेवारी उपलब्ध होईल आणि त्यानुसार विकास योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयामुळे सामाजिक समता आणि विकासाला चालना मिळेल, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.