पालकमंत्र्याच्या हस्ते तहसीलदार बंडू कापसेंचा सन्मान

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्याने जळगाव जिल्ह्यात ई-पिक पाहणी आणि रेशन कार्ड आधार सीडिंग या दोन महत्त्वाच्या उपक्रमांत प्रथम क्रमांक पटकावून भूषणावह यश मिळवले आहे. या कामगिरीबद्दल तहसीलदार बंडू कापसे यांचा जिल्हास्तरीय सन्मान पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे व आमदार किशोरअप्पा त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार आर.डी. पाटील, अव्वल कारकून सचिन पाटील व तलाठी हेमंत जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे रावेर तालुक्याने ई-पिक पाहणीमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. शेतकऱ्यांच्या शेतीची तांत्रिक व अचूक नोंद घेण्याचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यात आले.

तसेच,रेशन कार्ड लाभार्थ्यांचे आधार सीडिंग या अभियानात पुरवठा अधिकारी विवेक शिरेकर यांना त्यांच्या स्टॉप मध्ये काम करणारे किशोर शिंदे,गजानन बारी,सुरेश महाजन,राजू महाजन,सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रावेर तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. या दुहेरी यशाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे आयोजित समारंभात तहसीलदार बंडू कापसे व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनशक्ती, चिकाटी आणि तळमळ यामुळेच रावेर तालुक्याला हा मानाचा पुरस्कार मिळविता आला आहे.आज निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी तहसील कार्यालयात दोन्ही पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांच्या स्वागत केले.

Protected Content