सामाजिक न्याय विभागाची ‘आपला सहायक’ सेवा आता व्हाट्सअप वर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने “आपला सहायक” ही सेवा आता व्हाट्सअप वर सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्यात आली असून, व्हाट्सअपच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नागरिक खालील सुविधा सहज घेऊ शकतात :

“आपला सहायक ” सेवा 9423184567 या व्हाट्सअप क्रमांकावर उपलब्ध आहे. ही सेवा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून, नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

“आपला सहायक-तुमचा विश्वासू डिजिटल सहायक” या संकल्पनेतून नागरिकांच्या सेवेचा नवा अध्याय सुरु झाला आहे, असे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले.

Protected Content