डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ‘पक्ष्यांसाठी निवारा’ उपक्रम राबविला

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘पक्ष्यांसाठी निवारा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः कृत्रिम घरटी तयार केली आणि शाळेच्या परिसरात बसवली. तसेच, पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे पक्ष्यांना सुरक्षित आश्रय देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांना अंगणात व गॅलरीत पाणी ठेवण्याच्या तसेच घरटी बसवण्याच्या उपयुक्त सूचना देण्यात आल्या.

या वेळी शाळेच्या प्रिन्सिपल भारती महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही संरक्षणाची गरज असते. या उपक्रमातून त्यांच्यावर प्रेम करण्याची शिकवण मिळाली आहे.” उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content