शिक्षकांना टीईटीच्या अटीतून वगळावे – शिक्षक संघटनेची मागणी

bhusaval nivedavn

 

भुसावळ प्रतिनिधी । सेवेत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीच्या अटीतून वगळावे व तसेच प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामाची सक्ती करु नये, अशा मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे विविध गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याची अट पूर्णपणे अयोग्य आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासुन हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. त्यामुळे अशी अट शासनाने रद्द करावी, विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी खाजगी शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. अशा शिक्षकांना शिक्षण विभागाने मान्यता दिल्या आहेत. पंरतू आता असा दावा केला जात आहे की, टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या, मात्र हे शिक्षण विभागाचे धोरण अयोग्य आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रताधारक शिक्षकांवर टिईटीची अट लादणे अयोग्य आहे. ते पत्र शासनाने त्वरीत रद्द करावे, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.

यावेळी शिक्षक संघटनेने तहसीलदार दीपक धिवरे व प्रांताधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार दिलीप बारी तसेच गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, जीवन महाजन, दीपक नारखेडे, रवींद्र पाटील, विजय चौधरी, देव सरकटे, आसिफ बेग, हरीश कोल्हे, स्वाती कुलकर्णी, आनंदा सपकाळे, नरेश मुऱ्हेकर, योगेश बोरसे, तुषार भोळे, अमोल ठाकूर, योगेश साठे, वर्षा पाटील, सचिन महाजन यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content