भुसावळात स्व. सुभाष बागुल यांच्या स्मृतीदिनानिमित्त अन्नदान (व्हिडीओ)

bhusaval 1

भुसावळ प्रतिनिधी । येथील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा जेष्ठ पत्रकार कै. सुभाष बागुल यांच्या पाचवे स्मृतिदिनानिमित्त (दि.३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी ६ वाजता गडकरी नगर भागातील संत गाडगेबाबा वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्याना बागुल परिवारातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व अन्नदान करण्यात आले होते.

शिवसेना नाशिक पश्चिम विभाग विधानसभा संघटक महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नरेश सोनवणे व चंद्रकांत बागुल यांच्याहस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्व. सुभाष बागुल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सामुहिक प्रार्थना म्हणून आदरांजली वाहिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवसेना माजी पश्चिम विभाग विधानसभा महिला संघटक  सातपुर नाशिक तेली समाज महिला अध्यक्ष डॉ. वृषाली सोनवणे यांचेसह उपस्थितांचे हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल यासह चॉकलेट देण्यात आले.

प्रसंगी अनिल बागुल, मंदार बागुल, दर्शन कर्पे, आदित्य, पृथ्वीराज, पत्रकार राजेश पोतदार, पत्रकार उज्वला बागुल, ॲड पांडव, चंद्रकला बागुल, जान्हवी बागुल यांचेसह बागुल परिवार व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content