Home धर्म-समाज लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक-पालक सभा

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक-पालक सभा

0
213


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक पालक सभा नुकतीच घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर यांनी शिक्षक पालक सभेचे अध्यक्षस्थान भूषवले.

यावेळी अनिता सैंदाणे यांनी प्रास्ताविक केले. शालेय शिस्त व्यवस्थापन यासंदर्भात संगीता शेलार यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम व सराव परीक्षा यासंदर्भात अनंत हिरे यांनी मार्गदर्शन केले. अतुल देशमुख, अभिजीत सिसोदे,वैशाली कासार उपस्थित होते. अभिजीत सिसोदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले तर फलक लेखन अनंत हिरे यांनी केले. सदर सभेत शिक्षक पालक संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

सदर पालक सभेत विविध सहशालेय उपक्रम, शालेय शिस्त, स्पर्धा परीक्षा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी पालकांना संबोधताना आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा. तसेच विद्यार्थ्यांच्या अपयशातही पालकांनी भक्कमपणे साथ द्यावी. त्यांची इतरांशी तुलना करू नये. अशा स्वरूपाचे उद्बोधन केले. शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिक्षक पालक सभा संपन्न झाली. सदर प्रसंगी संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाने, ज्ञानेश्वर गांगुर्डे, अनंत हिरे, सुयोग पाटील, सचिन पाटील व चंद्रकांत पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound