तक्रार करण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाला पोलीसांकडून धक्काबुक्की; कारवाईची मागणी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सामरोद गावात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू विक्री केली जात आहे. ही दारूविक्रीमुळे महिला, विद्यार्थी व नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलीसात तक्रार देण्यासाठी विद्यमान सरपंच पती व माजी सरपंच श्रीकांत पाटील हे ग्रामस्थांसह जामनेर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले असता पोलीसांनी धक्काबुक्की केली असा आरोप माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी केला आहे.

गावातील दारूची विक्री होत आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विद्यमान सरपंच पती व माजी सरपंच श्रीकांत पाटील हे जामनेर पोलीस स्टेशन ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे केली. मात्र पोलीस निरीक्षक यांनी दारूबंदी विभागाकडे बोट दाखवले. यावेळी माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी मग तुमचे पोलीस हप्ते कसे घेतात, असा सवाल उपस्थित केला. याचा राग पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना आला व त्यांनी श्रीकांत पाटील यांना दालनाचा बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांनी माजी सरपंच श्रीकांत पाटील यांच्या कॉलरवर हात टाकण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की करत पोलीस स्टेशनला बाहेर काढले. या घटनेच्या निषेध जामनेर तालुका सरपंच परिषदतर्फे करण्यात आला असून पोलीस महासंचालक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. जामनेर पोलिस स्टेशनच्या दोघेही पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार केली. चौकशी करून दोघा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष राजमल भागवत, श्रीकांत पाटील, दत्ता साबळे, विनोद चौधरी, युवराज पाटील, बाळू धुमाळ, बाळू चव्हाण यांच्यासह सरपंच परिषद पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Protected Content