टाटा समूहाला धक्का : सायरस मिस्त्रींंना मानले अध्यक्ष

tata company

 

मुंबई प्रतिनिधी । कॉर्पोरेट जगातील सर्वात मोठी बोर्डरूम बटालियन आणि टाटा सन्समधील संघर्षातील राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने बुधवारी महत्वाचा निर्णय दिला. मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत आणि लवादाने टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून नटराजन चंद्रशेखरन यांची निवड बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे.

सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्‍टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. टाटा समूहातील सुशासनाचा आग्रह धरणाऱ्या मिस्त्री यांनी विश्‍वस्तांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. दोन्ही बाजुंनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागण्यात आली. या संघर्षात कधी मिस्त्री तर कधी टाटा समूहाची सरशी झाली, मात्र गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण कंपनी कायदा लवादाकडे प्रलंबित होते. टाटा समूहाविरोधात तीन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मिस्त्री यांना अखेर न्याय मिळाला आहे.

Protected Content