Home Cities धरणगाव धरणगाव नगराध्यक्ष निवडणूक : सात उमेदवार रिंगणात

धरणगाव नगराध्यक्ष निवडणूक : सात उमेदवार रिंगणात

0
167


evm1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या पोटनिवडणुकीत आज (दि.१८) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण १३ जणांनी माघार घेतल्याने आता केवळ सात उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. माघार घेणाऱ्यात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचाही समवेश आहे.

 

रिंगणात उरलेल्या सात उमेदवारांत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ईब्राहीम अब्दुल रसूल हाजी शेख यांचा समावेश आहे. याशिवाय मधुकर बन्सी माळी (भाजपा), निलेश सुरेश चौधरी (शिवसेना), संजय एकनाथ माळी (अपक्ष), महेंद्र सुभाष पाटील (अपक्ष), निलेश भगवत चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस) व उमेश जानकीराम माळी (अपक्ष) हे उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत.

माघार घेणाऱ्यात वसंतराव शिवदास बोलाने, संभाजी गोविंदा धनगर, गुलाबराव रतन वाघ, ललित बाळकृष्ण येवले, इसाक मोहम्मद्यासीन मोहम्मद, दीपक गोकुळ जाधव, तौसीफ सलीम पटेल, गोपाल जगन्नाथ पाटील, प्रवीण रघुनाथ चौधरी, महेंद्र गुलाब महाजन, संजय छगन महाजन, सुरेखा विजय महाजन व दीपक आनंदा वाघमारे या १३ उमेदवारांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound