फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर प्रतिनिधी । लेवा पाटीदार समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव भाजपाच्या पहिल्या यादीत समाविष्ट नव्हेत. परंतू दुसऱ्या यादीत खडसेंचे नाव नसल्यास लेवापाटीदार समाजाच्या वतीने युतीवर बहिष्कार टाकून युतीच्या उमेदवारांना मतदान करू नये असे आवाहन करण्यात येईल, असा निर्णय उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाच्या कार्यकारणीने आजच्या बैठकीत घेतला आहे.
उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ हा सामाजिक संघ आहे. 1 ऑक्टोबर रोजी रोजी लेवा पाटील समाजाचे अग्रगण्य नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव भाजपाच्या यादीत नसल्यामुळे समस्त लेवा पाटीदार समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून लेवा पाटीदार समाजाच्या या नेत्यावर अन्याय होत आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीत जर एकनाथराव खडसे यांचे नाव नसले तर या पाटीदार समाजातील आमदार हरिभाऊ जावडे व सुरेश भोळे त्यांनी सुद्धा भाजपचे तिकीट नाकारून अपक्ष निवडणूक लढवावी व आपली नाराजी व्यक्त करावी, असे आवाहन उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
तिकीट नाही मिळाले तर बहिष्कार टाकणार
तसेच एकनाथराव खडसे यांना तिकीट दिले नाही तर उल्हासनगर लेवा पाटीदार एकदा संग युतीच्या उमेदवार बहिष्कार टाकून त्यांना मतदान करणार नाही व सर्व महाराष्ट्रातील या पाटीदार समाजाच्या मंडळाच्या सभासदांनी ही युतीवर बहिष्कार टाकून युतीच्या उमेदवारांना लेवा पाटीदार समाजातील समाजबांधवांनी मतदान करू नये असे आवाहन केले आहे. एकनाथराव खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी व आपल्या सर्व समाज मंडळींनी त्यांना सहकार्य करून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करावी, असे सर्वानुमते ठरवा करण्यात आला. लेवा पाटीदार समाजाच्या कुटुंब प्रमुख यांनी वरील सर्व बाबींचा विचार करून सर्व समाज मंडळांना सूचित करावे, असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावावर डॉ.सुभाष नारखेडे, निळकंठ चौधरी, राजेंद्र पाटील व संजय चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.